सुखावह आयुष्याची पेरणी 

विशाल, डेरेदार वृक्षाची सावली अनुभवण्यासाठी किंवा त्याची फळे चाखण्यासाठी आधी बी पेरावे लागते, उगवलेले रोप वाढवावे लागते. हे करत असताना त्या रोपाची काळजी घेणे, त्याला आधार देणे, खत पाणी घालणे हे सगळे ओघाने आलेच. आणि या सर्व कृती सातत्याने काही वर्षे कराव्या लागतात.

त्याचप्रमाणे तुमचा भविष्यकाळ आर्थिक दृष्ट्या सुखकर जावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर तज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करून आवश्यक अशी कृती तुम्ही SIP माध्यमातून निश्चितच करू शकता.

आपल्या स्वप्नांना, संकल्पनांना आणि ध्येयांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी समर्पितपणे व सातत्यपूर्ण पद्धतीने प्रयत्न करणे गरजेचे असते.

विचार रुपी बीजं, तसेच संयम आणि अभ्यास करून घेतलेली जोखीम, भावनांवर नियंत्रण ठेवून दीर्घ कालावधीसाठी सातत्यपूर्ण पद्धतीने केलेल्या गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळू शकतो….. आणि अशा दीर्घ कालावधीनंतर या गुंतवणुकीच्या विचाराच्या बीजाचा डेरेदार वृक्ष तयार होतो की ज्याच्या सावलीत तुम्ही निवांतपणे बसू शकाल.

म्युच्युअल फंडातील गुंतवणुक ही बाजारातील जोखीमेच्या अधीन आहेत योजनेसंबंधी सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.